महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फेडररने रचला इतिहास; जिंकला १०० वा एटीपी किताब - किताब

दुबई येथे खेळल्या गेलेल्या दुबई ओपनच्या अंतिम सामन्यात फेडरर स्टेफोनोवर मात करत ऑस्ट्रेलिया ओपनमधील पराभवाचा वचपा काढला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये स्टेफनोवर मात करत स्पर्धेच्या बाहेर काढले होते. पहिल्या सेटमध्ये फेडररने स्टेफनोची पहिलीच सर्व्हिस ब्रेक करत आपले इरादे स्पष्ट केले.

रॉजर फेडरर

By

Published : Mar 3, 2019, 7:58 PM IST

दुबई - टेनिसचा बादशहा आणि स्वीत्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने दुबई ओपन जिंकत एकेरीतील १०० वा एटीपी किताब जिंकून इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या जिमी कॉर्नरनंतर १०० एटीपी किताब जिंकणारा दुसरा खेळाडू बनला आहे. दुबई ओपनच्या अंतिम सामन्यात फेडररने युनानच्या स्टेफनो त्सित्सिपासवर ६-४, ६-४ ने मात केली आहे. जिमी कॉर्नरने १०९ एकेरी एटीपी स्पर्धा जिंकल्या आहेत.

दुबई येथे खेळल्या गेलेल्या दुबई ओपनच्या अंतिम सामन्यात फेडरर स्टेफोनोवर मात करत ऑस्ट्रेलिया ओपनमधील पराभवाचा वचपा काढला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये स्टेफनोवर मात करत स्पर्धेच्या बाहेर काढले होते. पहिल्या सेटमध्ये फेडररने स्टेफनोची पहिलीच सर्व्हिस ब्रेक करत आपले इरादे स्पष्ट केले. स्टेफनोकडे ५व्या सर्विसमध्ये फेडररची सर्व्हिस ब्रेक करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र फेडररने आपल्या अनुभवाचा फायदा घेत पहिला सेट ६-४ ने जिंकला.

दुसऱ्या सेटमधील चौथ्या सर्व्हिसमध्ये फेडररने स्टेफनोची सर्व्हिस ब्रेक करत सेटमध्ये आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत दुसरा सेटसह सामना ६-४, ६-४ ने जिंकला. आपल्या करिअरमधील विक्रमी १०० वा एकेरी एटीपी किताब जिंकला. फेडररच्यानंतर अमेरिकेच्या इवान लेंडी ९४ एकेरी किताब जिंकला आहे, तर स्पेनचा राफेल नदाल 80वा एकेरी किताब जिंकला आहे. त्याखालोखाल अमेरिकेच्या जॉन मॅकन्रोने ७७ तर सर्बियाच्या नोवाच जोकोविचने ७३ एकेरी किताब जिंकले आहेत. त्याखालोखाल मोनॅकोचा बियोन बोर्ग ६४ किताब जिंकला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details