नवी दिल्ली -शेवटच्या क्षणी फिरलेला सामना आणि युरोपच्या नावावर परत एकदा लेवर कपचे विजेतेपद. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात टीम युरोपच्या अॅलेक्झँडर ज्वेरेवने टीम वर्ल्डच्या मिलोस राओनिकला पराभूत केले. आणि युरोपच्या संघाने एकच विजयी जल्लोष केला.
हेही वाचा -
टीम युरोपचे हे लागोपाठ चौथे विजेतेपद आहे. रोमहर्षक झालेल्या शेवटच्या सामन्यात ज्वेरेवने राओनिकवर ६-४, ३-६, १०-४ अशी मात केली. आणि युरोपने टीम वर्ल्डविरुद्ध आपली गुणतालिका १३-११ अशी केली. या विजयानंतर, टीय युरोपचा कर्णधार ब्योर्न बोर्गने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'मला माझ्या संघावर गर्व आहे. आणि मी खुप खुष आहे.'
कालच्या दिवशी टीम वर्ल्डचा संघ ७-५ ने आघाडीवर होता. त्यानंतर जॉन इस्नर आणि जैक सॉक यांनी रॉजर फेडरर आणि स्टीफनोस सितसिपास यांच्या जोडीचा पुरुष दुहेरीत पराभव केला. त्यामुळे ही आघाडी ८-७ अशी झाली. टीम वर्ल्डच्या टेलर फ्रिट्सने डॉमनिक थीमला पाणी पाजत ही आघाडी ११-७ ने वाढवली. पण, त्यानंतर रॉजर फेडररच्या जोडीने जॉन इस्नरला हरवत युरोपचे आव्हान जिवंत ठेवले.
शेवटच्या लढतीत अॅलेक्झँडर ज्वेरेवने टीम वर्ल्डच्या मिलोस राओनिकला पराभूत करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.