होबार्ट -कझाकिस्तानच्या एलेना रायबाकीनाने चीनच्या झांग शुईचा पराभव करत होबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद जिंकले. २० वर्षीय रायबाकीनाने शुईचा ७-६ (७), ६-३ असा पराभव केला.
हेही वाचा -विनेश फोगाटची नवीन वर्षात दमदार कामगिरी, जिंकले सुवर्णपदक
रायबाकीनाच्या कारकीर्दीतील हे दुसरे डब्ल्यूटीए जेतेपद आहे. तिसऱ्या सीडेड रायबाकीनाने चौथ्या सीड शुईचा दीड तासात पराभव केला. या विजेतेपदानंतर रायबाकीना जागतिक क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर झेप घेऊ शकते. तिला आगामी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २९ वे मानांकन मिळाले आहे.
तत्पूर्वी, भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने दोन वर्षांनंतर पुनरागमन करताना, होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धचे विजेतेपद पटकावले. ३३ वर्षीय सानियाने आपली युक्रेनची जोडीदार नादिया किचेनोक हिच्यासह खेळताना, कारकिर्दीतील ४२ वा डब्ल्यूटीए किताब पटकावला. दरम्यान, मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.