महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

डॉ. फिलिप पिंटो स्मृती टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन, नावनोंदणीला सुरुवात - गोवा टेबल टेनिस संघटना

डॉ. फिलिप पिंटो स्मृती टेबल टेनिस स्पर्धेचे दर वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ही स्पर्धा १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. याची माहिती संयोजक कबीर पिंटो यांनी दिली.

डॉ. फिलिप पिंटो स्मृती टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन, नावनोंदणीला सुरूवात

By

Published : Sep 14, 2019, 9:23 PM IST

पणजी - गोवा टेबल टेनिस संघटनेच्या वार्षिक कँलेंडरमध्ये स्थान मिळवलेल्या, डॉ. फिलिप पिंटो स्मृती टेबल टेनिस स्पर्धेचे दर वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी ही स्पर्धा १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. संयोजक कबीर पिंटो यांनी आज पणजीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत यांची घोषणा केली. डॉ. फिलप पिंटो स्मृती तिसरी अखिल गोवा वरिष्ठ मानांकन टेबल टेनिस स्पर्धा आहे.

पणजीतील क्लब वास्को द गामामध्ये खेळविण्यात येणारी ही स्पर्धा कँडेट मुली आणि मुले, सब-ज्युनिअर मुली आणि मुले, ज्युनिअर मुली आणि मुले, महिला आणि पुरुष एकेरी अशा गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.

गतवर्षी या स्पर्धेत ३०० हून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यावेळी ही अशाच प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांची अपेक्षा आहे. दरम्यान, गोवा टेबल टेनिस संघटनेच्या वार्षिक कँलेंडरमध्ये या स्पर्धेने स्थान मिळवले आहे.
या स्पर्धेचे महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या हस्ते १७ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पणजीचे महापौर उदय मडकईकर उपस्थित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेत ख्रिस्तोफर मिनेझीस, विष्णू कोलवाळकर, फ्रान्सिस्को दी नोरोन्हा, सोराया पिंटो मखिजा, कार्लोस दी नोरोन्हा आणि क्लाईव्ह सिक्वेरा आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details