स्पेन -बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमने रशियाच्या डेनिल मेदवेदेवचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवत किताब आपल्या नावावर केला आहे. डॉमनिकचे हे तेरावे एटीपी विजेतेपद ठरले आहे.
ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमने पटकावला बार्सिलोना ओपनचा किताब - tennis
डॉमनिकने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिग्गज खेळाडू राफेल नदाल पराभवाचा धक्का देत मोठा उलटफेर केला होता
![ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमने पटकावला बार्सिलोना ओपनचा किताब](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3149708-908-3149708-1556807198367.jpg)
डॉमनिक थिम
डॉमनिक हा १९९६ नंतर बार्सिलोना ओपनचे जेतेपद मिळवणारा ऑस्ट्रियाचा पहिलाच टेनिस खेळाडू ठरला आहे. डॉमनिकने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिग्गज खेळाडू राफेल नदाल ६-४, ६-४ ने पराभवाचा धक्का देत मोठा उलटफेर केला होता.
राफेलला बार्सिलोना ओपनचा राजा म्हणून ओळखले जाते. कारण त्याने ही स्पर्धा तब्बल ११ वेळा जिंकली आहे. तर २००५ ते २००९ या काळात सलग ५ वेळा हा किताब जिंकण्याचा विक्रमही नदालच्याच नावावर आहे.
Last Updated : May 2, 2019, 7:59 PM IST