बेलग्रेड -जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थीमने अॅड्रिया टूरच्या पहिल्या टप्प्याचे विजेतेपद पटकावले. त्याने फिलिप क्राझिनोविकचा 4-3 (7-2), 2-4, 4-2 असा पराभव केला. एका वृत्तानुसार, रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थीमला पहिल्या सेटमध्ये फिलिपबरोबर झुंज द्यावी लागली. मात्र, टाय ब्रेकमध्ये थीमने सरशी साधली.
पहिल्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी घेत क्राझिनोविचने थीमला अडचणीत आणले. परंतू थीमने तिसर्या सेटमध्ये अधिक उत्तम खेळ केला. अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या संस्थेने 13-14 जूनला ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम सामन्यापूर्वी, क्राझिनोविकने जोकोविचला 2-1 असे पराभूत केले होते.