मेलबर्न - यूएस ओपन विजेता डॅमिनिक थीम याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने जर्मनच्या डॉमिनिक कोएफर याचा एकतर्फा पराभव केला.
थीमने डॉमिनिक यांच्याविरुद्धचा सामना, १ तास ३९ मिनिटात ६-४, ६-०, ६-२ अशा फरकाने जिंकला. डॉमिनिक पहिल्या सेटमध्ये प्रतिकार देऊ शकला. तरीदेखील थीमने हा सेट ६-४ अशा फरकाने जिंकला. हाच धडाका त्याने कायम राखत पुढील दोन्ही सेट जिंकत सामन्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवले.
सामना संपल्यानंतर थीमने सांगितले की, 'हे खूप चांगलं होतं, प्रामाणिकपणेने सांगेन की हा सामना काही चांगला होता.'