मेलबर्न -ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. थीमने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश नोंदवला आहे. तब्बल ३ तास ४२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात थीमने ज्वेरेवला ३-६, ६-६, ७-६(७-३), ७-६(७-४) असे हरवले.
हेही वाचा -राणीने जिंकला 'वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर'चा पुरस्कार
या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी थीमला आता सात वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचशी झुंज द्यावी लागणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात जोकोविचने २० वेळा ग्रँड स्लॅम जिंकणार्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
गेल्या वर्षी या स्पर्धेच्या दुसर्याच फेरीत थीम बाहेर पडला होता. ग्रँडस्लॅममधील थीमची ही तिसरी अंतिम फेरी आहे. त्याने २०११ आणि २०१८ मध्ये दोन वेळा फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण राफेल नदालने त्याला पराभूत केले होते.