स्पेन (माद्रीद) -माद्रीद ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये रॉजर फेडररला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने फेडररवर 3-6, 7-6(11-13), 6-4 ने मात करत सेमी फायनलमध्ये धडक मारली.
माद्रीद ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये फेडररला पराभवाचा धक्का - Madrid Open
25 वर्षीय थीमने यापूर्वी झालेल्या इंडियन वेल्स टेनिस मास्टर्सच्या अंतिम फेरीतही रॉजर फेडररचा पराभव केला होता
या पराभवासह 3 वर्षानंतर क्ले कोर्टवर उतरलेल्या फेडररचे माद्रीद ओपनचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्नही भंगले आहे. सेमीफायनलमध्ये डोमिनिक थीमचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचशी होणार आहे. 25 वर्षीय थीमने यापूर्वी झालेल्या इंडियन वेल्स टेनिस मास्टर्सच्या अंतिम फेरीतही रॉजर फेडररचा पराभव केला होता.
या स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचला क्वार्टर फायनलमध्ये न खेळताच सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. क्रोएशियाच्या मारिन सिलिचने माघार घेतल्याने सामना न खेळताच नोव्हाकला पुढील फेरीचे तिकीट मिळाले.