स्पेन -सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने लॉकडाऊनचा नियम तोडत स्पेनमधील एका टेनिस क्लबमध्ये सराव केला. जोकोविचच्या या कृत्यानंतर स्पेनमधील मार्बेला येथील पुएन्ते रोमानो टेनिस क्लबने माफी मागितली आहे. या सरावाचा व्हिडिओही जोकोविचने शेअर केला होता.
स्पॅनिश टेनिस महासंघाने कोरोनाच्या धोक्यामुळे खेळाडूंना नियम पाळण्यास सांगत खेळाडूंना 11 मे पर्यंत कोर्टावरील प्रशिक्षणापासून दूर राहण्यास सांगितले होते. ''आम्हाला माहित आहे की व्यावसायिक खेळाडू आमच्या सुविधांचा वापर करण्यास पात्र होते आणि जोकोविचला प्रशिक्षण देण्यास अधिकृत होते. टेनिस फेडरेशनशी वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी आम्हाला हे स्पष्ट केले की टेनिस क्लब वापरण्यासाठी तुम्हाला 11 मे पर्यंत थांबावे लागेल'', असे या क्लबने सांगितले.