रोम - अग्रमानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविचने रोम ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जोकोविचने २४ व्या मानांकित अर्जेंटिनाच्या दियागो स्कॉर्टझमनवार ६-२, ६-७ (२-७),६-३ ने मात करत अंतिम फेरीत गाठली. जोकोविचचा अंतिम सामना क्ले कोर्टचा बादशहा स्पेनचा राफेल नदालशी होणार आहे.
रोम ओपन; नोवाक जोकोविच अंतिम फेरीत; स्कॉर्टझमनवर ६-२, ६-७,६-३ ने केली मात - set
जोकोविचने हा सेट ६-३ ने जिंकत सामना ६-२, ६-७ (२-७),६-३ ने आपल्या खिशात घातला. जोकोविचचा अंतिम सामना आता क्ले कोर्टचा बादशहा स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत जोकोविचने स्कार्टझमनवर अत्यंत चुरशीच्या सामन्यात मात दिली. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिला सेट ६-२ ने मात केली. या फेरीत जोकोविचने स्कॉर्टझमनचे दोन सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट ६-२ ने खिशात घातला.
दुसऱ्या सेटममध्ये स्कॉर्टझमनने आपल्या खेळाचे जोरदार प्रदर्शन केले. त्याने हा सेट टायब्रेकमध्ये नेला. या सेटमध्ये दोघांचाही कस लागला पण स्कॉर्टझमनने उत्तम फटके मारले. याचे उत्तार जोकोविचकडे नव्हते. टायब्रेकमध्ये ७-२ ने मात करत हा सेट ६-७ ने खिशात घालत सामना १-१ ने बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये जोकोविच आपल्या अनुभवाच्या जोरावर तिसरा सेट ६-३ ने जिंकला. तिसरा सेट २-२ ने बरोबरीत असताना जोकोविच स्कॉर्टझमनची सर्व्हिस ब्रेक केली. जोकोविचने हा सेट ६-३ ने जिंकत सामना ६-२, ६-७ (२-७),६-३ ने आपल्या खिशात घातला. जोकोविचचा अंतिम सामना आता क्ले कोर्टचा बादशहा स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे.