महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिविज शरण आणि अंकिता रैना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर - टेनिसपटू अंकिता रैना न्यूज

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत भारताचे पुरूष आणि महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.

divij sharan ankita raina crash out of australian open
दिविज शरण आणि अंकिता रैना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

By

Published : Feb 11, 2021, 1:30 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत भारताचे पुरूष आणि महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरूष दुहेरीत दिविज शरण आणि महिला दुहेरीत अंकिता हिचा पराभव झाला.

पुरूष दुहेरीत भारताच्या दिविजने स्लोवाकियाच्या इगोल जेलेने याच्यासोबत जोडी जमवली होती. या जोडीला जर्मनीच्या यानिक हाफमॅन आणि केनिन या जोडीने पराभूत केले. यानिक-केनिन जोडीने हा सामना ६-१, ६-४ असा जिंकला.

महिला दुहेरीत अंकिताने रोमानियाच्या मिहाइला बुजारनेकु हिच्यासोबत जोडी जमवली होती. या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत प्रथमच 'लकी लूझर'मधून खेळण्याची संधी मिळाली होती. लकी यूझर जोडीला वाइल्ड कार्ड जोडी ओलिविया गाडेकी आणि बेलिंडा वुलकॉक यांनी पराभूत केले. एक तास १७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात गाडेली-बेलिंडा जोडीने ६-३, ६-० ने बाजी मारली.

दरम्यान, पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि जपानच्या बेन मॅकलाचलान यांना पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. या जोडीला कोरियाची जी युंग नाम आणि मिन क्य सोंग या जोडीने ६-४, ७-६ ने पराभव केला.

हेही वाचा -पेत्रा क्वितोवा, व्हिनस विल्यम्स यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीतच बाहेर होण्याची नामुष्की

हेही वाचा -Australian Open : बार्टीचा विजय; सोफिया केनिनचे आव्हान संपुष्टात

ABOUT THE AUTHOR

...view details