महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूयॉर्क ओपन : दिविज शरण-आर्टेम सिताक उपांत्यपूर्व फेरीत - दिविज शरण-आर्टेम सिताक न्यूज

शरण-सिताक जोडीने अमेरिकेच्या ऑस्टिन क्राइजेक आणि क्रोएशियाच्या फ्रांको स्कूगर या जोडीला मात दिली. फ्रान्सचा युगो हंबर्ट आणि अमेरिकेचा जॅक्सन विथ्रो विरूद्ध अमेरिकेचा स्टीव्हन जॉन्सन, रिली ओपल्की यांच्यातील विजयी जोडीचा शरण-सिताक उपांत्यपूर्व फेरीत सामना करणार आहे.

Divij Sharan and his partner Artem sitak has moved to the quarter final of new york open
न्यूयॉर्क ओपन : दिविज शरण-आर्टेम सिताक उपांत्यपूर्व फेरीत

By

Published : Feb 11, 2020, 8:46 PM IST

न्यूयॉर्क -भारताचा आघाडीचा टेनिसपटू दिविज शरण आणि त्याचा जोडीदार न्यूझीलंडचा आर्टेम सिताक यांनी न्यूयॉर्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शरण-सिताक जोडीने अमेरिकेच्या ऑस्टिन क्राइजेक आणि क्रोएशियाच्या फ्रांको स्कूगर या जोडीला मात दिली.

हेही वाचा -खुशखबर!..पदकविजेत्या खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर

एक तास १९ मिनिटे रंगलेल्या सामन्यात शरण-सिताक जोडीने त्यांचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. फ्रान्सचा युगो हंबर्ट आणि अमेरिकेचा जॅक्सन विथ्रो विरूद्ध अमेरिकेचा स्टीव्हन जॉन्सन, रिली ओपल्की यांच्यातील विजयी जोडीचा शरण-सिताक उपांत्यपूर्व फेरीत सामना करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details