मेलबर्न - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या डिएगो श्वार्ट्जमॅन याने फ्रेंचमॅन अलेक्झांडर मुलर याचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. श्वार्ट्जमॅनने मुलरचा १ तास ३२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-२, ६-०, ६-३ अशा फरकाने पराभूत केले.
श्वार्ट्जमॅन याने सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. त्याने मुलर याची ९ वेळा सर्विस मोडीत काढली.
श्वार्ट्जमॅन याचा पुढील फेरीत रुसच्या असलान करत्सेव याच्याशी होणार आहे. करत्सेव याने दुसऱ्या फेरीत बेलारुसचा खेळाडू इगोर गेरासिमोव याचा ६-०, ६-१, ६-० ने पराभव करत तिसरी फेरी गाठली आहे.