बिजींग (चीन) -जपानची अव्वल महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अॅश्ले बार्टीचा धक्कादायक पराभव करत चीन ओपन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा चीनची राजधीनी बिजींग येथे पार पडली. अंतिम फेरीत नाओमीने बार्टीला पराभवाचा धक्का देत अजिंक्यपद पटकावले.
आज (रविवार) चीन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना जपानची नाओमी ओसाका आणि ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी यांच्यात झाला. या सामन्यात नाओमीने बार्टीचा ३-६, ६-३, ६-२ ने पराभव केला.
अॅश्ले बार्टी विरुध्द फटका मारताना नाओमी...(courtesy : China Open twitter) हेही वाचा -टेनिस : नोव्हान जोकोव्हिचने पहिल्यांदाच जिंकली जपान ओपन स्पर्धा
पहिला सेटमध्ये बार्टीच्या झंझावतासमोर नाओमीचा निभाव लागला नाही. पहिला सेट नाओमी ३-६ ने हरली. तेव्हा नाओमीने आपला खेळ उंचावत दुसरा सेट ६-३ ने जिंकला आणि सामना बरोबरीत राखला. यानंतर तिसऱ्या सेटमध्येही नाओमीने आपला धडाका ६-२ ने कायम राखत अजिंक्यपद पटकावले.
नाओमीचा फटका परतवताना अॅश्ले बार्टी... (courtesy : China Open twitter) दरम्यान, हा सामना ११० मिनिटांपर्यंत रंगला होता. दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. मात्र, नाओमी वरचढ ठरली. २१ वर्षीय नाओमीचे हे २०१९ मधील तिसरे व आपल्या कारकीर्दीतील ५ वे अजिंक्यपद ठरले आहे.
हेही वाचा -जपान ओपन : घरच्या मैदानावर ओसाकाने मिळवले विजेतेपद