लंडन -तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेता ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे पुढील महिन्यात जर्मनीच्या कोलोन येथे होणाऱ्या दोन इनडोअर स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. एका वृत्तानुसार, दोन्ही स्पर्धा कोलनमधील लांग्सेस अरेना येथे खेळल्या जातील. पहिली स्पर्धा ११ ते १८ ऑक्टोबर आणि दुसरी स्पर्धा १८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल.
ब्रिटनचा अँडी मरे जर्मनीत खेळणार - andy murray upcoming tournaments
फ्रेंच ओपननंतर, एटीपी स्पर्धेत समाविष्ट झालेल्या चार नवीन स्पर्धांमध्ये या दोन स्पर्धांचा समावेश आहे. कोरोनाच्या साथीमुळे चीन आणि जपानमधील स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात मरेने यूएस ओपनमध्ये भाग घेतला होता. तेथे त्याला दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या फेलिक्स एगर एलिसियामीकडून पराभवाचा सामना करावा लागला.
![ब्रिटनचा अँडी मरे जर्मनीत खेळणार Slug Britain's tennis player andy murray will compete in two indoor tournaments in germany](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8765695-thumbnail-3x2-dfd.jpg)
फ्रेंच ओपननंतर, एटीपी स्पर्धेत समाविष्ट झालेल्या चार नवीन स्पर्धांमध्ये या दोन स्पर्धा आहेत. कोरोनाच्या साथीमुळे चीन आणि जपानमधील स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात मरेने यूएस ओपनमध्ये भाग घेतला होता. तेथे त्याला दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या फेलिक्स एगर एलिसियामीकडून पराभवाचा सामना करावा लागला.
तब्बल २० महिन्यांनंतर मरे ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्यासाठी उतरला होता. २७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये खेळण्याचे संकेत त्याने यापूर्वी दिले आहेत. कोलोन येथील इनडोअर स्पर्धेत मरे जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव आणि यूएस ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या गिलिस मोनफिल्सबरोबर सामील होईल.