लंडन -तब्बल ६ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारा अग्रमानांकित टेनिसस्टार बोरिस बेकर आर्थिक संकटात सापडला आहे. 475 करोड रुपयांचे कर्ज चूकवण्यासाठी त्याने सर्व ट्रॉफी व मेडल्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बेकरच्या पदके, चषक, घड्याळ आणि फोटोग्राफ अशा 82 वस्तू लिलावात ठेवण्यात येणार आहेत.
कर्ज परतफेडीसाठी माजी अग्रमानांकित टेनिसस्टार बोरिस बेकर विकणार आपल्या ट्रॉफ्या ! - tennis
2017मध्ये बेकर यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आले होते.
बोरिस बेकर
वयाची 17 वर्ष गाठण्याआधीच बेकर यांनी सहा स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावली होती. यामध्ये त्यांनी विम्बल्डन - 1985, 1986 व 1989, ऑस्ट्रेलिया ओपन - 1991 व 1996, अमेरिकन ओपन - 1989 अशा सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
बेकर सध्या टेनिस स्पर्धांमध्ये समालोचनाच्या भूमिकेत असतात. 2017मध्ये बेकर यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आले होते.