पॅरिस - भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेयाचा जोडीदार ओलिवर मराच यांनी पॅरिस मास्टर ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत फॅब्रिस मार्टिन आणि जीन जूलियन रॉजर यांचा पराभव केला. मार्टिन-रॉजर ही जोडी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असून त्यांना बोपण्णा-मराच जोडीने पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली.
पहिल्या सेटमध्ये बोपण्णा-मराच जोडी पिछाडीवर होती. त्यांनी पहिला सेट ३-६ असा गमावला. यानंतर त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये शानदार वापसी करत हा सेट ६-४ असा जिंकत सामन्यातीत आव्हान जिंवत ठेवले. निर्णायक सेटमध्ये १०-८ अशी बाजी मारत सामना आपल्या नावे केला.