नवी दिल्ली -जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेली कॅनडाची महिला टेनिसपटू बियांका अँड्रेस्क्युने ग्रँडस्लॅम स्पर्धा फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. बियांका उर्वरित सत्रामध्ये विश्रांती घेणार असून ती तिच्या आरोग्याकडे आणि प्रशिक्षणाकडे लक्ष देणार आहे.
बियांका म्हणाली, "यावेळी मी न खेळण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. मी उर्वरित हंगामात विश्रांती घेईन आणि माझ्या आरोग्यावर आणि प्रशिक्षणाकडे लक्ष देईन." बियांकाने यूएस ओपनमध्येही सहभाग घेतला नव्हता. गेल्या वर्षी शिनझेन येथे खेळल्या गेलेल्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये ती खेळली आणि तेव्हापासून ती कोर्टात परतली नाही. यावर्षी तिने जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही भाग घेतला नव्हता.