महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Australian Open : उलटफेर... बियांका ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून बाहेर, सू-वेईने दिला धक्का

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी गटातील दुसऱ्या फेरीत बुधवारी उलटफेर पाहायला मिळाला. तैवानच्या हसीह सू वेई हिने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या बियांकाला पराभूत केले.

ausopen-hsieh-su-wei-ousted-no-dot-8-seed-bianca-andreescu-in-straight-sets
Australian Open : उलटफेर... बियांका ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून बाहेर, सू-वेईने दिला धक्का

By

Published : Feb 10, 2021, 3:52 PM IST

मेलबर्न -ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी गटातील दुसऱ्या फेरीत बुधवारी उलटफेर पाहायला मिळाला. तैवानच्या हसीह सू वेई हिने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या बियांकाला पराभूत केले. हसीह हिने बियांकाविरुद्धचा सामना ६-३, ६-२ अशा फरकाने जिंकला.

बियांकाने २०१९ मध्ये अमेरिका ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सला धूळ चारत विजेतेपद पटकावले होते. यानंतर ती २०२० मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे, काही काळ टेनिसपासून लांब होती.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २० वर्षीय बियांकाला ३५ वर्षीय सू-वेई हिने पराभवाचा धक्का दिला. बियांकाला आपल्या खराब सर्विसचा फटका बसला. यात त्याने आपल्या दुसऱ्या सर्विसमध्ये २३ मधील १७ गुण गमावले. बियांकाने सामन्यात तब्बल सहा वेळा सर्विस गमावली.

दुसरीकडे हसीह सू-वेई हिने याआधी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सिमोना हालेप, विंबल्डन विजेती नाओमी ओसाका हिला २०१९ मध्ये पराभवाचा धक्का दिला आहे.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेनाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

हेही वाचा -ऑस्ट्रेलियन ओपन : रोहन बोपण्णा आणि बेन मॅकलॅचलनचा पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details