मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात बुधवारी उलटफेर पाहायला मिळाला. दोन वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी झेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा आणि अमेरिकेची अनुभवी खेळाडू व्हिनस विल्यम्स यांना दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.
जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या क्वितोवा हिला रोमानियाच्या सोराना क्रिस्टिया हिने पराभूत केले. दुसऱ्या फेरीतील सामन्यात क्रिस्टिया हिने क्वितोवाचा ६-४, १-६, ६-१ ने पराभव केला.
दुसरीकडे इटलीची सारा एरिना हिने व्हिनस विल्यम्सचा ६-१, ६-० ने धुव्वा उडवला. या सामन्यात व्हिनसला दुखापत झाली.