मेलबर्न : वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुरुष एकेरीमध्ये रशियाचा आघाडीचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात त्याने स्टेफानोस सितसिपासला ६-६, ६-२, ७-५ असे हरवले. अंतिम फेरीत त्याचा सामना सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचशी होणार आहे.
गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोव्हिचसाठी उपांत्य फेरीचा सामना सोपा गेला. त्याने या फेरीत रशियाच्या अस्लान करात्झेव्हचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.