महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

प्रेक्षकांशिवाय रंगणार ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा..वाचा कारण - ऑस्ट्रेलियन ओपन न्यूज

वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली. यात मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश घेण्याची परवानगी होती.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा

By

Published : Feb 12, 2021, 4:09 PM IST

मेलबर्न - यूकेमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची प्रकरणे पाहता मेलबर्नमध्ये पाच दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली. यात मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश घेण्याची परवानगी होती. आता या लॉकडाउनमुळे मेलबर्नमधील पाच मिलियन रहिवाशांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : दुसऱ्या कसोटीसाठी पाहुण्यांचा संघ जाहीर, ब्रॉड परतला

प्रत्येकजण सुरक्षित राहू शकेल आणि कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी ते सरकारबरोबर एकत्रितपणे यावर काम करत असल्याचे टेनिस ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे. ''टेनिस ऑस्ट्रेलिया सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकारबरोबर काम करत आहे. कोविड प्रोटोकॉलसह आजची योजना पूर्ण वेळापत्रकानुसार चालविली जाईल. ज्यांच्याकडे तिकीट, खेळाडू आणि कर्मचारी आहेत त्यांना या बदलाबद्दल सांगितले जात आहे. आणि ज्यांच्याकडे तिकिट आहे त्यांना पैसे परत केले जातील. परताव्यासाठी अर्ज कसा करावा, ते लवकरच सांगितले जाईल'', असेही टेनिस ऑस्ट्रेलियाने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details