मेलबर्न - भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवली आहे. यासह ती कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवणारी भारताची पाचवी महिला खेळाडू बनली आहे.
अंकिता महिला एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरली. पण, तिला पहिली फेरी संपण्याआधी लकी यूझरच्या माध्यमातून क्वालीफाय करण्याची संधी असणार आहे.
अंकिताने रोमानियाची टेनिसपटू मिहेला बुजारनेकु हिच्यासोबत दुहेरीत जोडी जमवली आहे. या जोडीला महिला दुहेरीत सरळ प्रवेश मिळाला आहे. याआधी भारताच्या निरुपमा मांकड (1971), निरुपमा वैद्यनाथन (1998), सानिया मिर्झा आणि भारतीय-अमिरेकी शिखा ओबरॉय (2004) यांनी ग्रँडस्लॅममध्ये मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश मिळवला होता.