मेलबर्न -वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या महामुकाबल्यामध्ये आज दोन नामवंत खेळाडू एकमेकासंमोर उभे ठाकणार आहेत. 'वर्ल्ड नंबर वन' सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि रशियाचा 'स्टार' खेळाडू डॅनिल मेदवेदेव यांच्यात पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळख असलेला जोकोविच आपल्या १८व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
दुसरीकडे, सलग २० सामने जिंकत मेदवेदेवने सर्वांना थक्क करत आपला स्पप्नवत प्रवास सुरू ठेवला आहे. त्याने अव्वल-१० टेनिसपटूंपैकी १२ खेळाडूंना पराभूत केले आहे. जोकोव्हिचने मेदवेदेववर चार विजय मिळवले असले, तरी मेदवेदेनेही त्याला तीन वेळा पराभूत करण्याची किमया साधली आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या मेदवेदेवने आजचा सामना जिंकला तर, तो क्रमवारीत दुसऱ्या स्थानी उडी घेईल. ''मी एक आव्हान देणारा मनुष्य आहे. अंतिम फेरीत आठ वेळा खेळलेल्या आणि प्रत्येक वेळी जिंकलेल्या माणसाला मी आव्हान देऊ इच्छितो आणि मी याबद्दल आनंदी आहे. मला नोवाक विरुद्ध खेळायला आवडते. टेनिसच्या इतिहासातील तो महान टेनिसपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध अंतिम सामना खेळणे मोठी कामगिरी असेल. मी याबद्दल खरोखर आनंदी आहे'', असे मेदवेदेवने सांगितले.
जोकोविच-मेदवेदेव यांचे उपांत्य सामने -