मेलबर्न- वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिली एकेरीत सेरेना विल्यम्स, गतविजेती नाओमी ओसाका आणि पुरूष गटात रॉजर फेडररने दुसरी फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे व्हिनस विल्यम्सला अमेरिकेच्याच १५ वर्षीय कोरी गॉफने पराभवाचा धक्का दिला.
महिला एकेरी -
- अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने पहिल्या फेरीत रशियाच्या एनस्टासिया पोटापोवाचा ६-०,६-३ ने एकतर्फी पराभव केला. सेरेनाने पहिला सेट अवघ्या १ मिनिटात जिंकला.
- गतविजेती जपानच्या नाओमी ओसाकाने झेक रिपब्लिकच्या मॅरी बोजकोवाचा ६-२, ६-४ ने पराभव केला. ८० मिनिटे रंगलेल्या सामन्यात नाओमीने बाजी मारली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
- व्हिनस विल्यम्सला तिच्याच देशाच्या १५ वर्षीय कोरीने पराभवाचा धक्का दिला. १ तास ३७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात कोरीने ७-६ (७/५), ६-३ अशी मात दिली.
- डेनमार्कची कारोलिन वोजनियाकीनेही दुसरी फेरी गाठली आहे. तिने अमेरिकेच्या क्रिस्टी एन हिचा ६-१, ६-३ ने पराभव केला.