मेलबर्न- भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. बुधवारी मिश्र दुहेरीत सानिया भारताच्याच रोहन बोपण्णाच्या साथीने कोर्टवर उतरणार होती. पण तिने दुखापतीमुळे कोर्टवर न उतरणेच पसंत केले. आज तिचा महिला दुहेरीतील सामना होता. ती आपली युक्रेनची जोडीदार नाडिया किचेनॉकसह मैदानात उतरली खरी, पण तिला दुखापतीमुळे सामना अर्ध्यातून सोडवा लागला.
महिला दुहेरीत सानिया-नाडिया जोडीचा सामना, चीनच्या शिवयुन हॅन-लिन जु या जोडीशी झाला. सामन्यादरम्यान सानियाची दुखापत उफाळून आली. तेव्हा तिने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सामना सोडण्याच्या आधी चीनच्या जोडीने पहिला सेट ६-२ ने जिंकला होता. तर दुसऱ्या सेटमध्येही चीनची जोडी १-० ने आघाडीवर होती.