मेलबर्न- टेनिस 'सुंदरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. क्रोएशियाच्या डोना वेकिकने मारियाला धूळ चारली. दरम्यान, मारिया तब्बल ३ वर्षांच्या बंदीच्या शिक्षेनंतर पहिल्यांदा कोर्टवर उतरली होती. तर दुसरीकडे अमेरिकेच्या मॅडिसन किजने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.
डोना वेकिकने १ तास २१ मिनिटे रंगलेल्या सामन्यात मारियाला ६-३, ६-४ अशी सहज मात दिली. दरम्यान, पाच जेतेपदे नावावर असणाऱ्या शारापोव्हाला मेलडोनियम या प्रतिबंधित उत्तेजकाच्या सेवन प्रकरणी १५ महिन्यांच्या बंदीची शिक्षा करण्यात आली होती.
दुसरीकडे महिला एकेरीत अमेरिकेची स्टार खेळाडू मॅडिसन किजने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत तिने रशियाच्या दरिया कासटकिना हिचा ६-३, ६-१ ने पराभव केला.