नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाच्या २० वर्षीय अॅलेक्स मिनाउरने अटलांटा टेनिस ओपन स्पर्धेत विक्रम रचला आहे. तीसऱ्या सीडेड मिनाउरने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या रिले ओपेल्कावर मात करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात प्रवेश करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
अटलांटा टेनिस ओपन : ऑस्ट्रेलियाच्या २० वर्षीय मिनाउरने रचला इतिहास, असा विक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू - टायब्रेकर
मिनाउरने ओपेल्कावर 7-6 (4), 6-7 (5), 6-3 अशी मात केली.
![अटलांटा टेनिस ओपन : ऑस्ट्रेलियाच्या २० वर्षीय मिनाउरने रचला इतिहास, असा विक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3970600-1052-3970600-1564309893144.jpg)
मिनाउरने ओपेल्कावर 7-6 (4), 6-7 (5), 6-3 अशी मात केली. यंदाच्या हंगामात हार्ड कोर्टवर मिनाउरने १४ सामन्यांत विजय मिळवले आहेत. तर, त्याला ४ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. चुरशीच्या झालेल्या या उपांत्य सामन्यात मिनाउरला जास्त मेहनत घ्यावी लागली. दोन्ही सेट टायब्रेकरपर्यंत गेले होते. परंतू, शेवटी मिनाउरने बाजी मारली.
सामना संपल्यानंतर मिनाउरने प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. तो म्हणाला, 'दुखापतीला सोबत घेऊन मी इथेपर्यंत पोहोलचो आहे. मी चांगला खेळ खेळत आहे. आणि मला माहित आहे त्याचे फळ नक्की मिळेल.' पहिल्या टायब्रेकरमध्ये मिनाउरने 7-4 ने जिंकला त्यानंतरच्या टायब्रेकरमध्ये 5-7 ने हार पत्करावी लागली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र त्यांनी ओपेल्काला संधी न देता विजय मिळवला.