मोनाको - कोरोनामुळे संकटात सापडलेल्या प्रशिक्षकांना मदत करण्यासाठी एटीपीने (असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स) निधी उभारणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. एटीपीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या चाहत्यांना पॉल एनाकोन, बोरिस बेकर, डॅरेन कॅहिल, ब्रॅड गिलबर्ट, गोरान इव्हानिसेव्हिक, इव्हान लेन्डल, इव्हान लुबी, कार्लोस मोया, पॅट्रिक मोरॅटोग्लू आणि मॅरियन वाज्दा यांसारख्या दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळेल.
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या प्रशिक्षकांना एटीपी करणार मदत - The ATP tour latest news
यामधून जमा होणारा निधी कोरोनामुळे संकटात असलेल्या प्रशिक्षकांना दिला जाईल. शिवाय, काही निधी जागतिक कोरोना मदत निधीमध्ये देण्यात येईल. एटीपीने या तीन आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी निविदा प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली आहे. ही प्रक्रिया 29 जूनपर्यंत सुरू राहील.
यामधून जमा होणारा निधी कोरोनामुळे संकटात असलेल्या प्रशिक्षकांना दिला जाईल. शिवाय, काही निधी जागतिक कोरोना मदत निधीमध्ये देण्यात येईल.
एटीपीने या तीन आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी निविदा प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली आहे. ही प्रक्रिया 29 जूनपर्यंत सुरू राहील. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत 70 लाख 80 हजार 811 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 लाख 5 हजार 74 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 लाख 55 हजार 104 जण कोरोनामुक्त झाले आहेत. न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.