महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टेनिस : 'हायव्होल्टेज' सामन्यात फेडररने केला जोकोविचचा एकतर्फी पराभव - फेडररने केला जोकोविचचा पराभव

विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविचने फेडररला ५ तास रंगलेल्या रोमांचक सामन्यात नमविले होते. यामुळे या सामन्यातही जोकोविचचे पारडे वरचढ मानले जात होते. पण फेडररच्या झंझावती खेळासमोर जोकोविचचा निभाव लागला नाही. फेडररने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना जोकोविचचा ६-४, ६-३ असा धुव्वा उडवला.

टेनिस : 'हायव्होल्टेज' सामन्यात फेडररने केला जोकोव्हिचचा एकतर्फी पराभव

By

Published : Nov 16, 2019, 9:36 AM IST

लंडन - टेनिस विश्वातील 'हायव्होल्टेस' सामना रॉजर फेडरर विरुध्द नोव्हाक जोकोविच. एटीपी फायनल्समध्ये झालेल्या या सामन्यात रॉजर फेडररने विम्बल्डन अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढत नोव्हाक जोकोविचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. या शानदार विजयासह फेडररने एटीपी फायनल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविचने फेडररला ५ तास रंगलेल्या रोमांचक सामन्यात नमविले होते. यामुळे या सामन्यातही जोकोविचचे पारडे वरचढ मानले जात होते. पण फेडररच्या झंझावती खेळासमोर जोकोविचचा निभाव लागला नाही. फेडररने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना जोकोविचचा ६-४, ६-३ असा धुव्वा उडवला.

नोव्हाक जोकोविच

पहिल्या सेटमध्ये जोकोविचने फेडररचा प्रतिकार केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये फेडररचा खेळ जबरदस्त होता. त्याने या वेळी सलग तीन सेट जिंकत बाजी मारली आणि जोकोविचचे आव्हानही संपुष्टात आणले. फेडररने एटीपी फायनल्स स्पर्धेत विक्रमी १७ व्यांदा सहभाग घेतला असून त्याने १६ व्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

हेही वाचा -टेनिसच्या महानायकाने साजरा केला ५० वा विजय, गाठली अंतिम फेरी

हेही वाचा -पंतप्रधान मोदींनी केले मेदवेदेवचे कौतुक, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details