ल्यूसाने - असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) ने सेफ्टी पॉलिसीच्या रिव्हू संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. यात त्यांनी, व्यावसायिक टेनिसमध्ये सहभागी सर्व प्रौढ आणि अल्पवयीनांना गैरवर्तनापासून वाचवण्यासाठीच्या वचनबद्धतेनुसार, सुरक्षा धोरण जाहीर केले आहे. हे धोरण एक स्वतंत्र रिपोर्ट कमिशन द्वारा तयार करण्यात आले आहे. याचे संकलन खास सल्लागाराच्या एका टीमने केले आहे.
एटीपीने याविषयी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, दुरुपयोग प्रकरणात एटीपी आचारसंहितेनुसार पुढील कारवाई करण्याची आवश्यकता आहे का हे तपासले जात होते. यामुळे या प्रकरणात न्यायालयीन अधिकारींना यावर निर्णय देण्यापासून रोखलं जात असे.
रिपोर्टमध्ये संघटनाची सुरक्षा वाढवणे आणि अधिक सक्रिय भागिदारीच्या संधीची ओळख पटवण्यासाठीच्या अनेक शिफारसी निर्धारित करण्यात आल्या आहेत. एटीपी घरगुती हिंसा संदर्भातील प्रकरणासह अनेक सुरक्षा प्रकरणात आपल्या शिफारसी आणि पुढील वाटचालीचे मुल्यांकन करणार असल्याचे देखील एटीपीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.