लंडन -प्रोफेशनल टेनिस असोसिएशन (एटीपी) आणि महिला टेनिस असोसिएशनने (डब्ल्यूटीए) त्यांच्या टेनिस दौर्यांची स्थगिती जुलै अखेरपर्यंत वाढवली आहे. यासह टेनिसच्या रद्द झालेल्या स्पर्धांची संख्या आता 40 च्या वर गेली आहे. कोरोनामुळे एटीपीने आपला एटीपी दौरा 31 जुलै 2020 पर्यंत पुढे ढकलला असल्याचे एटीपीने म्हटले.
कोरोनामुळे टेनिस स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले - ATP and WTA latest news
टेनिसच्या रद्द झालेल्या स्पर्धांची संख्या आता 40 च्या वर गेली आहे. निवेदनात म्हटले आहे, की सदस्यांचा सल्ला घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. हॅम्बर्ग, बास्टेट, न्यूपोर्ट, लास कॅबोस, स्टॅडट, उमाग, अटलांटा आणि किट्झबुले या स्पर्धा वेळापत्रकानुसाार होणार नाहीत. ही स्थगिती चॅलेन्जर टूर आणि आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूरलाही लागू आहे.

निवेदनात म्हटले आहे, की सदस्यांचा सल्ला घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. हॅम्बर्ग, बास्टेट, न्यूपोर्ट, लास कॅबोस, स्टॅडट, उमाग, अटलांटा आणि किट्झबुले या स्पर्धा वेळापत्रकानुसाार होणार नाहीत. ही स्थगिती चॅलेन्जर टूर आणि आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूरलाही लागू आहे. वेळापत्रकाची अधिक माहिती जूनच्या मध्यामध्ये देण्यात येईल.
"डब्ल्यूटीए दौऱ्यांच्या स्थगितीनंतर 12 जुलैपर्यंत बस्ताद, लॉसने, बुखारेस्ट आणि जुर्मला येथील स्पर्धा कोरोनामुळे होणार नाही. कार्लस्रुहे आणि पालेर्मो या स्पर्धेसाठी पुढील तारखा जूनच्या मध्यास देण्यात येतील'', असे डब्ल्यूटीएने सांगितले.