पॅरीस - ऑस्ट्रेलियाच्या ८ व्या मानांकित अॅश्ले बार्टीने ३८ व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वाँडुरसोवाचा पराभव करत पहिला ग्रँडस्लॅम किताब जिंकला. शनिवारी झालेल्या अंतिम समान्यात बार्टीने मार्केटा हिचा ६-१, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
फ्रेंच ओपन : ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने जिंकले पहिले ग्रँडस्लॅम - women
पहिल्या सेटमध्ये बार्टीने ४-० अशी आघाडी घेतली होती. यानंतर मार्केटाने आपली पहिली सर्व्हिस जिंकत एक गेम जिंकला. मात्र त्याला बार्टीने पहिल्या सेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. त्यानंतर झालेल्या दोन्ही सर्व्हिस गेम जिंकत बार्टीने पहिला ६-१ ने खिशात घातला. त्यानंतर दुसरा सेटमध्ये मार्केटाने काही खास खेळ दाखवला नाही.
या संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा दबदबा कायम राहिला. पहिल्या सेटमध्ये बार्टीने ४-० अशी आघाडी घेतली होती. यानंतर मार्केटाने आपली पहिली सर्व्हिस जिंकत एक गेम जिंकला. मात्र त्याला बार्टीने पहिल्या सेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. त्यानंतर झालेल्या दोन्ही सर्व्हिस गेम जिंकत बार्टीने पहिला ६-१ ने खिशात घातला. त्यानंतर दुसरा सेटमध्ये मार्केटाने काही खास खेळ दाखवला नाही. दुसरा सेटही बार्टीने ६-३ अशा फरकाने जिंकत सामना ६-१, ६-३ अशा सरळ सेटमध्ये जिंकला.
या विजयानंतर बार्टी पुढच्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या महिला टेनिस क्रमवारीत २ नंबरच्या स्थानावर येईल. १९७३ नंतर फ्रेंच ओपन जिंकणारी खेळाडू ठरली आहे.