पॅरिस -भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैनाने फ्रेंच ओपनच्या पात्रता स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. पहिल्या फेरीत अंकिताने जोवाना जोविकला पराभूत केले. अंकिताने जोवानाला ६-४, ४-६, ६-४ असे हरवले.
अंकिता आणि जोवानामध्ये २ तास ४७ मिनिटे हा सामना रंगला होता. आता अंकिताचा सामना जपानच्या कुरुमी नाराशी होईल. ग्रँडस्लॅमच्या मुख्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी अंकिताला आणखी दोन विजयांची आवश्यकता आहे.