मेलबर्न -भारताची आघाडीची महिला टेनिसपटू अंकिता रैनाने एकेरी गटात ऑस्ट्रेलियन ओपन पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ११८व्या क्रमांकावर असलेल्या कतरिन जावत्स्कावर अंकिताने विजय नोंदवला. परंतु पुरुष एकेरीत रामकुमार रामनाथनला पराभव पत्करावा लागला आहे.
दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला एकेरीच्या पात्रता गटात अंकिताने दुसर्या फेरीत युक्रेनियन खेळाडूला ६-२, २-६, ६-३ असे पराभूत केले. अंकिता सहाव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.