शांघाई -माजी अव्वल खेळाडू ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे शांघाई मास्टर्स स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत इटलीच्या फेबियो फोगनिनीने मरेवर मात केली. तब्बल तीन तास रंगलेल्या सामन्यात फोगनिनीने मरेला ७-६, २-६, ७-६ असे हरवले.
टेनिस : शांघाई मास्टर्समधून मरे 'आऊट', सामन्यादरम्यानचा 'शट-अप' व्हिडिओ व्हायरल
या सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये तणाव पाहायला मिळाला. मरेने फोगनिनीला 'शट-अप' म्हटलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ३२ वर्षीय मरेने २०१०, २०११ आणि २०१६ मध्ये शांघाई मास्टर्सचा किताब जिंकला होता. मरेला हरवल्यानंतर फोगनिनीचा सामना रूसच्या कारेन खाचनोव आणि अमेरिका के टेलर फ्रीज यांच्यातील विजेत्या खेळाडूशी होणार आहे.

दरम्यान, २० ग्रँडस्लॅम पटकावलेल्या रॉजर फेडररने या स्पर्धेत विजयारंभ केला आहे. दुसऱ्या सीडेड फेडररने स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलासला ६-२, ७-६ असे सहज हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, रुसच्या डॅनियल मेदवेदेवने ब्रिटनच्या कॅमरॉन नोरीला ६-३, ६-१ असे हरवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.