मेलबर्न -अमेरिकेची २१ वर्षीय टेनिसपटू सोफिया केनिनने तिच्या कारकीर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात केनिनने ट्युनिशियाच्या ओन्स जबेऊरचा ६-६, ६-४ असा पराभव केला.
हेही वाचा -IPL २०२० : ठरलं तर.. फायनलचा थरार रंगणार मुंबईत.. ही आहे तारीख
केनिनने सरळ सेटमध्ये जबेऊरला मात दिली. तत्पूर्वी, एश्लेग बार्टीने ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. बार्टीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पेट्रा क्विटोव्हाचा ७-६, ६-२ असा पराभव केला. उपांत्य सामन्यात बार्टी आणि केनिन हे आमनेसामने असणार आहेत.
तत्पूर्वी, अव्वल खेळाडू राफेल नदालने आज (सोमवार) खेळवण्यात आलेल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. नदालने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू निक किर्गियोस याला रोमांचक सामन्यात ६-३, ३-६, ७-६ (६), ७-६ (४) अशी धूळ चारली.