शांघाय - सध्या सुरू असलेल्या शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या युवा टेनिसपटू अॅलेक्झँडर ज्वेरेवने त्याला ६-३, ६-७ (७), ६-३ असे हरवले आहे.
टेनिस : फेडररला धक्का!..जर्मनीच्या युवा टेनिसपटूकडून पराभव - alex zverev latest news
शांघाय मास्टर्सच्या उपांत्य फेरीपर्यंत फेडररला जाता आले नाही. तत्पूर्वी, त्याची घोडदौड ज्वेरेवने रोखली.
शांघाय मास्टर्सच्या उपांत्य फेरीपर्यंत फेडररला जाता आले नाही. तत्पूर्वी, त्याची घोडदौड ज्वेरेवने रोखली. उपांत्य फेरी पाचव्या सीडेड ज्वेरेवचा सामना ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीम आणि इटलीचा माटेयो बेरेटीनी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. २०१४ आणि २०१७ मध्ये फेडररने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
या सामन्यात चेंडू कोर्टबाहेर मारल्यामुळे फेडररला पेनल्टी मिळाली होती. ग्रीसचा युवा खेळाडू स्टीफनोस सितसिपास आणि रशियाचा डेनिल मेदवेदेव याने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.