दुबई - आयसीसी स्पर्धेतील आपली विजयी परंपरा कायम ठेवत न्यूझीलंडने टीम इंडियाला पुन्हा एकदा लोळवलं. या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडियासाठी उपांत्यपूर्ण फेरीत पोहचण्याची आशा धुसर झाली आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधाराचा निर्णय साऱ्थ ठरवत किवी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले व टीम इंडियाला त्यांनी अवघ्या 110 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रच न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
धावांचा पाठलाग करताना डॅरेल मिशेल आणि मार्टिन गप्टिल या जोडीने न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 24 धावा असताना गप्टिलच्या रुपात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. बुमराहने त्याला 20 धावांवर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार केन विल्यमसनने मिशेलच्या साथीने संघाच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. बुमराहने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर डॅरेल मिशेलला बाद केले. केन विल्यमसनने 31 चेंडूत नाबाद 33 आणि कॉन्वेन नाबाद 2 धावा करत संघाला 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह न्यूझीलंडनं स्पर्धेत सेमीफायनल खेळण्याची आपली दावेदारी भक्कम केली आहे. तर भारत जवळपास स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे.