ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का. कर्णधार अरोन फिंच पाच धावांवर माघारी. बोल्टने फिंचला धाडले माघारी.
AUS vs NZ T20 WC Final : न्युझीलंडला आठ विकेट्सने नमवून ऑस्ट्रेलिया T-20 विश्वविजेता
21:32 November 14
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
21:30 November 14
ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी मैदानात
ऑस्ट्रेलियाकडून अरोन फिंच व डेव्हीड वॉर्नर ही सलामी जोडी मैदानात.
21:29 November 14
न्युझीलंडचा डाव
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडने कर्णधार केन विल्यमसनच्या झुंझार 85 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवले आहे. न्युझीलंडची सलामी जोडी मार्टिन गप्टिल व डॅरिल मिशेल यांनी डावाची सुरुवात केलीय मिशेल स्टार्कने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकर ठोकून गप्टीलने आक्रमक सुरूवात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे किवींना जखडून टाकले. पॉवर प्लेमध्ये न्युझीलंडच्या केवळ 32 धावा झाल्या होत्या व मिशेलची विकेट गमावली होती. त्यानंतर 28 धावा काढून गप्टीलही बाद झाला. 10 षटकांनंतर न्युझीलंडच्या 2 बाद 57 धावा झाल्या होत्या.
त्यानंतर विल्यमसन-फिलिप्स जोडीने धावगती वाढवत एकेरी-दुहेरी धावसंख्येवर भर दिला. विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. स्टार्कने टाकलेल्या १६ व्या षटकात विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करत २२ धावा लुटल्या. १६ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३६ धावा केल्या व विल्यमसन-फिलिप्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. १८व्या षटकात फिलिप्स (१८) आणि विल्यमसन (८५) ही जमलेली जोडी बाद झाली व धावगतीवर पुन्हा अंकुश आला. जेम्स नीशम आणि टिम सेफर्टने 20 षटकात संघाची धावसंख्या 4 बाद 172 पर्यंत पोहोचवली. नीशमने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूनने 3 तर इम्पाने 1 बळी घेतला. आज स्टार्क खूप महागडा गोलंदाज ठरला त्यांच्या 4 षटकात किवींनी 60 धावांची लयलूट केली. त्याला एकही बळी मिळवता आला नाही.
21:12 November 14
१६ षटकात न्यूझीलंडने कुटल्या 22 धावा
ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने १६वे षटक टाकले. या षटकात विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करत २२ धावा लुटल्या. १६ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३६ धावा केल्या. फटकेबाजीमुळे विल्यमसन-फिलिप्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. विल्यमसन ७७ तर फिलिप्स १५ धावावंर खेळत आहे.
20:14 November 14
10 षटकात न्यूझीलंड 1 बाद 57
मिचेल मार्शने टाकलेल्या नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतक पूर्ण केले. विल्यमसनने या षटकात दोन चौकार ठोकले. 10 षटकात न्यूझीलंडने १ बाद ५7 धावा केल्या. केन विल्यमसन 18 तर गप्टील 27 धावांवर खेळत आहेत.
20:00 November 14
पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या 1 बाद 32 धावा
सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने १ बाद ३२ धावा केल्या. सहाव्या षटकात न्यूझीलंडला २ धावा करता आल्या. चौथ्या षटकात हेझलवूडने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने मिशेलला (११) यष्टीपाठी झेलबाद केले.
19:34 November 14
न्यूझीलंडची सलामी जोडी मैदानात -
मार्टिन गप्टिल व डॅरिल मिशेल ही न्यूझीलंडची सलामी जोडी मैदानात. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने टाकले पहिले षटक. दुसऱ्यास चेंडूवर गप्टीलने चौकर ठोकून खाते उघडले.
19:34 November 14
अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघात एक बदल -
न्यूझीलंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉन्वे हाताच्या दुखापतीमुळे अंतिम लढतीला मुकणार आहे. कॉन्वेच्या माघारीमुळे टिम सेफर्टला संधी मिळाली आहे.
19:26 November 14
ऑस्ट्रेलियाची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
19:07 November 14
नाणेफेकीचा कौल ठरणार महत्वपूर्ण.. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकण्याचा ट्रेंड
टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये जो ट्रेंड पाहायला मिळाला आहे, त्यामध्ये नाणेफेक जिंकणारा संघ अधिक वेळा विजयी झाला आहे. जवळपास 44 पैकी 29 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ विजयी झाला आहे. अंतिम सामना खेळवला जाणाऱ्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांपैकी 10 सामने अशा संघाने जिंकले आहेत. ज्या संघाने नाणेफेक जिंकली होती. दुबई इंटरनेशनल स्टेडियममध्ये ज्या संघाने प्रथम गोलंदाजी केली आहे, तो सघ 12 पैकी 11 सामन्यात विजयी झाला आहे तर केवळ एका सामन्यात प्रशम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला आहे. म्हणजे अंतिम सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल म्हत्वपूर्ण ठरणार आहे.
18:57 November 14
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यात नाणेफेकीचा कौल ठरणार महत्वपूर्ण
दुबई -ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुबईच्या स्टेडियमवर ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता दोन्ही संघ फायनल खेळण्यासाठी आमने-सामने येतील. पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे सामने अतिशय रोमांचक होते, त्यामुळे पुन्हा एकदा तुल्यबळ लढत पाहण्याची मेजवानी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन (संभाव्य)
ऑस्ट्रेलिया -
आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
न्यूझीलंड -
केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी.