महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T2O WC ENG vs NZ Semifinal : इंग्लंडला नमवत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

wc
wc

By

Published : Nov 10, 2021, 8:26 PM IST

Updated : Nov 10, 2021, 11:17 PM IST

23:12 November 10

इंग्लंडला नमवत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक

अबुधाबी -आज टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळवला गेला. विश्वविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आले होते. इंग्लंड आणि न्यूझीलंडने साखळी फेरीत दमदार कामगिरी करून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. दोन्ही संघांनी सुपर-१२ फेरीतील पाचपैकी चार सामने जिंकले होते. इंग्लंडने 20 षटकात 4 बाद 166 धावा करून न्यूझीलंडसमोर 167 धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाला न्यूझीलंडने चित्तथरारक लढत देऊन फायनलमध्ये धडक दिली आहे. 

22:19 November 10

11 षटकात न्यूझीलंडच्या 2 बाद 73 धावा

11 षटकात न्यूझीलंडच्या 2 बाद 73 धावा झाल्या आहेत. मायकेल नाबाद 28 व कॉन्वे 33 धावा काढून नाबाद आहेत.  

22:19 November 10

कर्णधार विल्यमसन केवळ पाच धावा काढून माघारी

तिसऱ्या षटकात न्यूझीलंडला जबर धक्का बसला.  कर्णधार विल्यमसन केवळ पाच धावांवर माघारी परतला. ख्रिस वोक्सने त्याला स्वस्तात माघारी धाडले. ३ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३ धावा केल्या. 

22:19 November 10

पहिल्याच षटकात न्यूझीलंडला धक्का

मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली, पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात गप्टिलला (४) झेलबाद केले. .

21:16 November 10

इंग्लंडच्या 20 षटकात 4 बाद 166 धावा, न्यूझीलंडसमोर 167 धावांचे आव्हान

20 व्या षटकात इंग्लंडने लिव्हिंगस्टोनचे विकेट गमावले. २० षटकात इंग्लंडने ४ बाद १६६ धावा केल्या. मोईन अलीने सर्वाधिक 51 धावा केल्या. इंग्लंडकडून बटलरने 29 तर मलानने 41 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टीम साउदी, निशाम, मिल्ने व व ईश सोढी यांनी 1-1 बळी घेतले. 

21:15 November 10

मोईन अलीचे अर्धशतक

मोईन अलीने नाबाद 51 धावा केल्या. अलीने 37 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले

21:15 November 10

इंग्लंडला चौथा धक्का.. लियाम लिव्हिंगस्टोन बाद

 लियाम लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. त्यामध्ये त्याने एक चौकार व एक षटकार टोकला

21:15 November 10

इंग्लंडला तिसरा धक्का

१६व्या षटकात टीम साउदीने मलानला माघारी धाडले.  मलानने ४ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा केल्या.

21:15 November 10

14 व्या षटकांत इंग्लंडचे शतक पूर्ण

१४ षटकात इंग्लंडने शतक पूर्ण केले. मलान आणि अली यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. १५ षटकात इंग्लंडने २ बाद ११० धावा केल्या.

20:14 November 10

आठव्या षटकात इंग्लंडचे अर्धशतक, सलामीवीर बटलर 29 धावांवर माघारी

आठव्या षटकात इंग्लंडने अर्धशतक पूर्ण केले. पुढच्याच षटकात फिरकीपटू ईश सोधीने बटलरला पायचीत पकडले. बटलरला ४ चौकारांसह २९ धावा करता आल्या.

20:14 November 10

सहा षटकात इंग्लंड 1 बाद 40 धावा

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात इंग्लंडला पहिला धक्का बसला. वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने बेअरस्टोला (१३) विल्यमसनकरवी झेलबाद केले. बेअरस्टोनंतर डेव्हिड मलान मैदानात आला आहे. सहा षटकात इंग्लंडने १ बाद ४० धावा केल्या.

20:12 November 10

पाच षटकात इंग्लंड बिनबाद 37 धावा

पाच षटकात इंग्लंडने बिनबाद ३७ धावा केल्या. इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो मैदानात.

20:07 November 10

टी-20 विश्वचषक न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला उपांत्य सामना

अबुधाबी -आज टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. विश्वविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंडने साखळी फेरीत दमदार कामगिरी करून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. दोन्ही संघांनी सुपर-१२ फेरीतील पाचपैकी चार सामने जिंकले होते. इंग्लंडने एकदाच टी-२० विश्वचषक जिंकला आहे. तर न्यूझीलंडचा संघ प्रथमच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

इंग्लंड -

 इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, मोईन अली, सॅम बिलिंग्स/डेव्हिड विली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, मार्क वुड, आदिल रशीद.

न्यूझीलंड -

 केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टिम साऊदी, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट.

Last Updated : Nov 10, 2021, 11:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details