टी २० वर्ल्डकपमध्ये आजचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. वेस्ट इंडिजच्या संघाने 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 157 धावा काढू शकला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ने 2 बाद 161 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने दमदार अर्धशतक ठोकून आपला फॉर्म सिध्द केला आहे. गेल्या काही सामन्यात त्याची बॅट तळपली नसल्याने संघात चिंतेचे वातावरण होते. 56 चेंडूत 89 धावा करताना वॉर्नरने 9 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना जिंकल्यामुळे गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाच्या नावावर 5 सामन्यात 4 विजय असून 8 गुण मिलाल्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे.