दुबई - टी-२० विश्वचषक २०२१मध्ये भारताचा दुसरा सामना आज न्यूझीलंडसोबत होत आहे. हा सामना दुबईत खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून भारतीय संघाला फलंदाजी साठी आमंत्रित केले आहे.
LIVE UPDATES :
- भारताच्या 20 षटकात 7 बाद 110 धावा
- भारताला चौथा धक्का; रोहित शर्मानंतर कर्णधार कोहली झेलबाद
- भारताच्या दहा षटकात 3 बाद 48 धावा
- भारताला तिसरा झटका; रोहित शर्मा आजही अपयशी
- केएल राहुल झेलबाद, भारताचे दोन फलंदाज तंबूत
- सहाव्या षटकात पहिल्याच चेंडूवर राहुलचा चौकार, सहाव्या षटकात भारताला दजुसरा धक्का
- भारताच्या पाच षटकात 29 धावा
- जीवदान मिळालेल्या रोहितचा चौकार आणि सलग षटकार
- इशान किशन झेलबाद, भारताच्या तीन षटकात बारा धावा
- इशान किशनचा चौकार, तर भारताला पहिला झटका
- केएल राहुलचा चौकार, भारताच्या दोन षटकात सहा धावा
- भारताची सावध सुरुवात, एका षटकात एक धाव
- सलामीवीर म्हणून केएल राहुल आणि डावखुरा इशान किशन मैदानात