महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NAM T20 WC : भारताचा नामिबियावर नऊ विकेट्सने विजय.. विराटच्या कर्णधारपदाचा विजयी समारोप - भारत नामिबिया सामना

IND vs NAM
IND vs NAM

By

Published : Nov 8, 2021, 7:18 PM IST

Updated : Nov 8, 2021, 10:41 PM IST

22:35 November 08

भारताचा नामिबियावर 9 गडी राखून विजय

दुबई -भारत आणि नामिबिया यांच्यात दुबईत खेळविण्यात आलेला टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामना  भारताने नऊ विकेटने जिंकून स्पर्धेचा विजयी समारोप केला. भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडल्याने हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा होता. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला गेलेला हा अंतिम टी-20 सामना होता. या सामन्यात रोहित शर्मा व के. एल राहुलने अर्धशतक ठोकून सामना जिंकला. सामनावीरचा पुरस्कार रविंद्र जडेजाला देण्यात आला.

133 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियांच्या डावाची सुरुवात  रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांनी केली. रुबेन ट्रम्पेलमनने नामिबियासाठी पहिले षटक टाकले.  दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या तीन षटकार भारताची धावसंख्या  बिनबाद २६ धावांवर पोहोचवली. रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत पाचव्या षटकात ११ धावा कुटल्या. ५ षटकात भारताने बिनबाद ४४ धावा केल्या. पॉवरप्लेच्या ६ षटकात भारताने बिनबाद ५४ धावा केल्या.  आठव्या षटकात रोहितने अर्धशतक पूर्ण केले. हे रोहितचे २४वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठरले.  आठ षटकात भारताने बिनबाद ७० धावा केल्या.

१२व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. १२ षटकात भारताने १ बाद १०५ धावा केल्या.१०व्या षटकात नामिबियाचा वेगवान गोलंदाज जॅन फ्रायलिंकने रोहितला बाद केले. रोहितने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. १० षटकात भारताने १ बाद ८७ धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. के. एल राहुलने 36 चेंडूत 54 धावा केल्या यामध्ये 2 षटकार व 4 चौकारांचा समावेश आहे. सुर्यकुमार यादवने 19 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 25 धावा केल्या.

नामिबियाचा डाव -

नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन यांनी ३३ धावांची सलामी दिली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात लिंजेनला (१४) झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने फिरकीत अडकवले. आठव्या षटकात जडेजाने सलामीवीर बार्डला पायचीत पकडले. बार्डने २१ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने जडेजा-अश्विनने नामिबियाला धक्के दिले. अनुभवी फलंदाज डेव्हिड वीजाने २६ धावांचे योगदानन दिल्यामुळे नामिबियाला शतकी पल्ला ओलांडता आला. नामिबियाने २० षटकात ८ बाद १३२ धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेतले.

21:09 November 08

नामिबियाचे भारतासमोर 133 धावांचे आव्हान

नामिबियाविरुद्ध सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली. ज्यामुळे नामिबियाच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 132 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून रविंद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 3-3 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या. 

20:29 November 08

नामिबियाचा अर्धा संघ गारद

अश्विनने १३व्या षटकात नामिबियाचा कप्तान गेरहार्ड इरास्मसला यष्टीपाठी झेलबाद केले. इरास्मसने ११ धावा केल्या. त्याच्यानंतर जेजे स्मिट मैदानात आला आहे. १३ षटकात नामिबियाने ५ बाद ७७ धावा केल्या.

19:57 November 08

नामिबियाला दुसरा धक्का; विल्यम्स शून्यावर माघारी

भारताचा फिरकी गोलंदाज जडेजाच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने विल्यम्सला यष्टीचीत केले. विल्यम्स शुन्यावर बाद झाला.

19:57 November 08

नामिबियालाला पहिला धक्का, लिंजेन 14 धावांवर बाद

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात लिंजेनला (१४) झेलबाद केले. त्याच्यानंतर क्रेग विल्यम्स मैदानात आला आहे. ५ षटकात स्कॉटलंडने १ बाद ३३ धावा केल्या.

19:12 November 08

नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नामिबिया प्रथम फलंदाजीस उतरणार आहे.

19:12 November 08

विराट कोहलीचा टी-20 कर्णधार म्हणून शेवटचा सामना

विराट कोहलीचा भारतासाठी टी-२० कप्तान म्हणून शेवटचा सामना आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी न मिळाल्यानंतर निराश झालेले भारतीय खेळाडू या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. 

19:03 November 08

भारताचा नामिबियावर 9 गडी राखून विजय

दुबई - टी-20 विश्वचषकाच्या 42 व्या सामन्यात भारतीय संघ आज दुबळ्या नामिबियाशी भिडणार आहे. भारतीय संघ दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर विश्वचषकातील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी न मिळाल्यानंतर निराश झालेले भारतीय खेळाडू या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. 

टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून भारत बाहेर पडला आहे. त्यामुळे विराटसेना या सामन्याने गोड शेवट करण्यास उत्सुक असेल. या गट २ मधून पाकिस्तान आणि न्यूझीलंडने बाद फेरीत प्रवेश केला. सुपर-१२ टप्प्यातील सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच भारताच्या आशा मावळल्या. गट १ मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचले. विशेष म्हणजे, विराट कोहलीचा भारतासाठी टी-२० कप्तान म्हणून शेवटचा सामना आहे. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ-

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, इशान किशन, राहुल चहर

नामिबियाचा संघ-

स्टीफन बार्ड, मायकेल व्हॅन लिंजेन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन (विकेटकिपर), डेव्हिड विसे, जेजे स्मित, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, क्रेग विल्यम्स, रुबेन ट्रम्पेलमन, कार्ल बिर्केनस्टॉक, बर्नार्ड शॉल्ट्ज, पिक्की या फ्रान्स, जॅन फ्रायलिंक, मिचाऊ डु प्रीझ, बेन शिकोंगो

Last Updated : Nov 8, 2021, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details