नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज ( Yuvraj Singh Birthday Today ) आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा टुर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू युवराज सिंग याचा आज वाढदिवस ( BCCI has Appreciated This Talented Batsman and Wished Yuvraj ) आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या वाढदिवसानिमित्त ( Man of Tournament of 2011 World Cup Winning Team ) त्याच्या या कामगिरीचे स्मरण करीत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ( BCCI has Wished Yuvraj Birthday ) आहेत. 402 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 11,778 धावा ( BCCI Celebrated Yuvraj Birthday ) केल्याबद्दल, तसेच 17 डाव खेळून 148 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचे अभिनंदन केले आहे.
बीसीसीआयने 2011 वर्ल्ड कप फोटो शेअर करीत युवराजला दिल्या हार्दिक शुभेच्छा : यासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2007 ICC T-20 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2011 ICC वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग असलेल्या युवराज सिंगचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आक्रमक शॉट्स खेळताना दिसत आहे. युवराज सिंहचा जन्म १२ डिसेंबर १९८१ रोजी माजी क्रिकेटर योगराज सिंह यांच्या घरी झाला होता. त्याच्या आक्रमक फलंदाजीसोबतच त्याची उपयुक्त फिरकी गोलंदाजी आणि भक्कम क्षेत्ररक्षणासाठी जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते.
वडिलांनी लहान वयापासूनच युवराजला दिले प्रशिक्षण :युवराजला त्याच्या वडिलांनी त्याला लहान वयातच क्रिकेटसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी त्याने पंजाब अंडर-16 संघात आणि नंतर अंडर-19 संघात प्रवेश करून आपली प्रतिभा दाखवली. 1997 मध्ये युवराजने फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक रेकॉर्ड बनवले.
बीसीसीआयने साजरा केला तडफदार फलंदाज युवराज सिंगचा वाढदिवस
युवराज विश्वकप विजेता भारतीय अंडर-19 संघाचासुद्धा खेळाडू राहिला :डावखुरा स्फोटक फलंदाज म्हणून युवराज सिंग पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्याने भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळताना श्रीलंकेविरुद्ध 55 चेंडूत 89 धावा केल्या. 2000 साली अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य म्हणून त्याने मालिकावीराचा पुरस्कारही जिंकला. त्यानंतरच त्याला 2000 मध्ये भारतीय संघात सामील होण्याची संधी मिळाली.
बीसीसीआयने साजरा केला तडफदार फलंदाज युवराज सिंगचा वाढदिवस
खराब फॉर्ममुळे युवराजला संघातून लागले वगळावे :2001 आणि 2002 मध्ये खराब फॉर्ममुळे युवराजला संघातून वगळावे लागले, असले तरी त्याच वर्षी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याने चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात दमदार पुनरागमन केले. 2002 च्या नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद कैफसोबत सहाव्या विकेटसाठी केलेली 121 धावांची भागीदारी आजही संस्मरणीय खेळीपैकी एक म्हणून स्मरणात आहे. ज्यामध्ये युवराजने 63 चेंडूत 69 धावा करून भारताला विजय मिळवून दिला.
2007 मध्ये टी-20 विश्वचषकात संघाचा उपकर्णधार :डावखुरा स्फोटक फलंदाज म्हणून युवराज सिंगला 2007 मध्ये टी-20 विश्वचषकात संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. या विश्वचषकात त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात 6 षटकार मारून इतिहास रचला. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ३० चेंडूत ७० धावा करीत त्याने संघाला अंतिम फेरी गाठण्यात मदत केली. यासोबतच त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कारही जिंकला. या विश्वचषकात युवराजने 300 हून अधिक धावा केल्या आणि 15 बळी घेतले.
2011 च्या विश्वचषकानंतर युवराजच्या कारकिर्दीत आला अत्यंत कठिण टप्पा :युवराजच्या कारकिर्दीतील कठीण टप्पा 2011 च्या विश्वचषकानंतर एक कठीण टप्पाही आला. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते अशक्त झाले. उपचारासाठी तो अमेरिकेला गेला आणि दोन वर्षांनी बरा झाल्यानंतर तो संघात परतला. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही चांगल्या डाव खेळूनही युवराज सध्या फिटनेसच्या समस्येमुळे भारतीय संघाबाहेर आहे. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसला.