नवी दिल्ली -टोकियो ऑलिम्पिक कोटा जिंकणारी भारतीय महिला नेमबाज यशस्विनी देसवाल हिने चौथ्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात ही कामगिरी नोंदवली.
ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेत यशस्विनी देसवालची सुवर्णकामगिरी - online shooting championship winner news
10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात आशिष डबास 243.1 गुणांसह द्वितीय तर अनीश भानवालाला 222.3 गुणांसह तिसरे स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रियाच्या मार्टिन स्टेमफलने 10 मीटर एअर रायफलमध्ये 253.8 शॉट्ससह अव्वल स्थान मिळवले. त्याने पात्रता फेरीमध्ये विश्वविक्रम नोंदवत 633.7 गुण कमावले.
ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत यशस्विनी देसवालची सुवर्णकामगिरी
10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात आशिष डबास 243.1 गुणांसह द्वितीय तर अनीश भानवालाला 222.3 गुणांसह तिसरे स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रियाच्या मार्टिन स्टेमफलने 10 मीटर एअर रायफलमध्ये 253.8 शॉट्ससह अव्वल स्थान मिळवले. त्याने पात्रता फेरीमध्ये विश्वविक्रम नोंदवत 633.7 गुण कमावले.
10 मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या रुद्राक्ष पाटीलने दुसरे तर, विष्णू शिवराज पांडियनने तिसरे स्थान राखले. शनिवारी झालेल्या या चौथ्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 11 देशांच्या नेमबाजांनी भाग घेतला.