सिधी (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रियंका केवटने, जॉर्जिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वुशु चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून ९ Priyanka Kewat won the gold medal ) भारताचे मान उंचावली आहे. 18 वर्षीय प्रियंका केवट ही सिधी जिल्ह्यातील प्रभाग 1 मधील रहिवासी आहे. शालेय दिवसांपासून ती वुशूची मजबूत खेळाडू आहे. तिने जगातील सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वुशु खेळाडूंना धूळ चारुन भारताचे नाव सुवर्णपदकावर कोरले.
वुशु ( International Wushu Championship ) हा असा खेळ आहे, ज्यामध्ये समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करावे लागतात, त्याच्याशी लढावे लागते. प्रियांकाचे आयुष्यही गरिबीशी लढत गेले आहे. सुवर्णपदक विजेत्या प्रियांकाचे वडील शिवराज केवट हे व्यवसायाने नर्सिंग होम ड्रायव्हर आहेत आणि आई सोनिया केवट एका खाजगी शाळेत प्यून म्हणून काम करते. प्रियांकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय कुटुंबापेक्षा कमकुवत आहे. पण आता प्रियांकाच्या विजयामुळे तिच्या कुटुंबाला नक्कीच बळ मिळेल.