महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटची 'कांस्य' पदकावर मोहर, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के - विनेश जिंकले पदक

बुधवारी दुपारी विनेशने रेपचेसचे दोन्ही राऊंड जिंकत २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान पक्क केले होते. त्यानंतर तिने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात ५३ किलो वजनी गटात ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीवर ४-१ ने मात केली.

विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटची 'कांस्य' पदकावर मोहर

By

Published : Sep 18, 2019, 7:53 PM IST

नूर सुल्तान (कझाकिस्तान) - भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतील विनेशने ग्रीसच्या प्रेवोलाराकीचा पराभव केला.

हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : अमितसह भारताच्या चार बॉक्सिंगपटूंची उपांत्यपूर्व फेरीत धडक

विनेशचा मंगळवारी जपानची दिग्गज कुस्तीपटू मायु मुकाइदा हिच्याकडून विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह विनेशचे या स्पर्धेच्या अंजिक्यपदाचे आव्हान संपुष्टात आले. मात्र, मुकाइदाने ५३ किलोच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने विनेशच्या रेपचेसद्वारे कांस्य पदकाच्या आशा कायम राहिल्या होत्या.

हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटचा धमाका, ऑलिम्पिक २०२० साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय

बुधवारी दुपारी विनेशने रेपचेसचे दोन्ही राऊंड जिंकत २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान पक्क केले होते. त्यानंतर तिने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात ५३ किलो वजनी गटात ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीवर ४-१ ने मात केली. दरम्यान, विनेशने २०१६ साली रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर तिला ३ स्पर्धामधून खाली हात परतावे लागले. आता तिने विश्व कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकत आपली प्रतिभा सिध्द केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details