नवी दिल्ली -भारतीय संस्कृतीमधील रक्षाबंधन हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणाच्या दिवशी भाऊ बहिणीला सदैव रक्षणाचे वचन देतो. भारताची ऑलिम्पिकविजेती साक्षी मलिकला हा खरोखरचा प्रत्यय आला आहे. रक्षाबंधनामुळे एका मोठ्य़ा प्रकरणातून साक्षी मलिकला सुटका मिळाली आहे.
त्याचे झाले असे की, भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. लखनऊच्या भारतीय खेल प्राधिकरणस्थित नॅशनल कॅम्पमधून साक्षी आणि दोन महिला कुस्तीपटूंनी अनुमती न घेता बाहेर गेल्या होत्या. असे केल्यामुळे त्यांना या कॅम्पमधून डब्ल्यूएफआयने निलंबित केले होते.